उच्च न्यायालयच्या आदेशानंतर तहसीलदार सुनील शिंदे सक्रिय
उच्च न्यायालयच्या आदेशानंतर तहसीलदार सुनील शिंदे सक्रिय पाम गावाच्या बस स्टैंड जवलिळ अतिक्रमणावर चालवला बुलडोझर क्राइम अलर्ट : स्वप्निल पिपले पालघर. पाम गावातील गुरचरण जागेवर मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांना अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत आदेश दिला आहे. मौजे पाम स.नं. १६० सरकारी गुरचरण जागेवर ग्रामस्थांनकरिता गावठण मंजूर केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करून चाळ, दुकानाचे बांधकाम करून भाडे पट्यावर देण्याचे काम सुरू असल्याबाबत माजी सरपंच अशोक बाबू वडे यांनी अनेकवेळा तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी केल्या परंतु तक्रारीला टोलवाटोलवी करत असल्याचे समजताच वडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत writ petition no-7592/2014 च्या आधार घेत महाराष्ट्र शासन व इतर तीन विरूद्ध contempt petition दाखल करत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांना चांगलाच दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माणिक गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुनील शिंदे यांनी अतिक्रमण धारकांस दिनांक २५ मे पर्यंत अतिक्रमणे हटविण्यात मुदत देण्यात आली होती ...