आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण
आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक टी-१५० येथील आरती ड्रग्स लिमिटेड कारखान्यात सोमवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान वायूगळतीची घटना घडली. या घटनेमुळे सालवड व शिवाजीनगर परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. युनिटमधील विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाच्या टाकीला भेग पडल्याने आम्लगळती झाली. त्यामुळे हवेत गच्च एचसीएल वायू मिसळून धुराचे लोट पसरले. या वायूमुळे नागरिक व कामगारांना डोळ्यांची जळजळ, घशात खवखव व श्वसनाचा त्रास जाणवला. माहिती मिळताच कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून गळतीवर नियंत्रण मिळवले. तसेच तारापूर अग्निशमन दल आणि बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीच्या कारवाईमुळे मोठे नुकसान टळले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. याआधीही १३ जुलै २०२४ रोजी याच कंपनीत ब्रोमीन वायूगळतीची घटना घडली होती. त्यामुळे शिवाजीनगर परिसरातील संतप्त नागरिकांनी पोलिसांना घेराव घालत कंपनी बंद करण्याची मागणी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मेडली फार्मास्युटिकल्स कारखान्यात वायूगळती होऊन चार का...