तरुणांना केमिकल माफिया बनवणारा 'आका' कोण? – बोईसरमधील तरुण गुन्हेगारीच्या गर्तेत!

तरुणांना केमिकल माफिया बनवणारा 'आका' कोण? – बोईसरमधील तरुण गुन्हेगारीच्या गर्तेत

बोईसर : बोईसर औद्योगिक क्षेत्रात रसायनांच्या अनधिकृत वाहतूक आणि फेकण्याच्या प्रकारांनी सध्या चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. विशेषतः, अनेक तरुण या बेकायदेशीर कामांमध्ये अडकत असून, त्यांच्या पाठीमागे काम करणारा खरा सूत्रधार – ‘आका’ – अद्यापही पडद्याआड आहे.

परिसरातील काही नामांकित औद्योगिक कंपन्यांचे मालक स्वतःला प्रतिष्ठित समजत असले तरी, हेच काहीजण तरुणांना अवैध मार्ग दाखवत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. "प्रामाणिक कामात काही मिळत नाही" असं सांगून तरुणांच्या हातात रसायनांची तस्करी, विल्हेवाट आणि फेकण्यासारखी धोकादायक कामं सोपवली जात आहेत. त्यामुळे 'शॉर्टकट संस्कृती'चा प्रसार होत असून, मेहनत, सचोटी या मूल्यांना तडा जात आहे.


तरुणांचा ‘कवच’ म्हणून वापर स्वतःचं नाव झाकण्यासाठी, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी, या माफियांनी तरुणांना पुढे केलं आहे. हे तरुण निर्जन स्थळी, नदीकाठी, जंगलात केमिकल फेकण्याचं काम करत आहेत. मात्र, मूळ सूत्रधार सुरक्षेच्या आडोशात राहून संपूर्ण धंदा चालवत आहे.


तरुणांचे भविष्य अंधारात टाकून या अवैध उद्योगात सामील झालेल्या तरुणांकडे पाहून इतर तरुणही झटपट पैसा कमावण्यासाठी त्याच मार्गावर वळत आहेत. त्यामुळे संपूर्ण पिढीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हा प्रकार फक्त गुन्हेगारीच नव्हे, तर पर्यावरणासाठी आणि समाजाच्या आरोग्यासाठीही गंभीर धोका ठरतो आहे.


 सध्या नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, पोलिस, पर्यावरण विभाग यंत्रणांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ‘त्या’ मास्टरमाइंड आक्याचा चेहरा उघड करून त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका